किती लागतील ?
मला अश्या ठिकाणी जायला आवडेल जिथे अशी लक्झरी असेल. मी सध्या अशा हॉटेल मध्ये जातो जिथे बसायला खुर्ची असते. मला असं शाहरुख सारखं बसावं वाटलं तरी ते तिथे शक्य होत नाही. आणि जिथे अशी व्यवस्था असते तिथे मी अजून तरी जाऊ शकत नाही. कारण आजच्या तारखेला (२७/०४/२०२०) मला ते परवडण्याजोगं नाही; एक दिवस नक्की असेल. काय कम्फर्ट आहे ना? हम्म. मला पण हवा आहे असा कम्फर्ट, असा फील. **** जगात जे जे काही भारी असेल, ते ते सर्व मला मिळावं.... असं प्रत्येकाला वाटतं आणि ते साहजिकही आहे. मग नक्की अडचण काय येते? तर, नेमका आपला फोकसंच चुकतो . ' मला असं शाहरुख सारखं बसायचं आहे एका हॉटेल मध्ये जाऊन. ' माझा फोकस त्याच्या अशा बसण्यावर राहतो. पण तिथे पोहचण्यासाठी त्याने काय केलं? यावर माझं लक्षंच जात नाही. आज मी सामान्य माणूस आहे आणि तिथे तसं बसणं म्हणजे माझ्यासाठी काही तरी असामान्य आहे. शाहरुख आज असामान्य माणूस आहे आणि तिथे तसं बसणं हे त्याला शोभतं आणि तो खरोखर या यशासाठी पात्र देखील...