किती लागतील ?
मला अश्या ठिकाणी जायला आवडेल जिथे अशी लक्झरी असेल.
मी सध्या अशा हॉटेल मध्ये जातो जिथे बसायला खुर्ची असते.
मी सध्या अशा हॉटेल मध्ये जातो जिथे बसायला खुर्ची असते.
मला असं शाहरुख सारखं बसावं वाटलं तरी ते तिथे शक्य होत नाही.
आणि जिथे अशी व्यवस्था असते तिथे मी अजून तरी जाऊ शकत नाही.
कारण आजच्या तारखेला (२७/०४/२०२०) मला ते परवडण्याजोगं नाही; एक दिवस नक्की असेल.
काय कम्फर्ट आहे ना? हम्म. मला पण हवा आहे असा कम्फर्ट, असा फील.
****
जगात जे जे काही भारी असेल, ते ते सर्व मला मिळावं....
असं प्रत्येकाला वाटतं आणि ते साहजिकही आहे.
मग नक्की अडचण काय येते?
तर, नेमका आपला फोकसंच चुकतो .
' मला असं शाहरुख सारखं बसायचं आहे एका हॉटेल मध्ये जाऊन. '
माझा फोकस त्याच्या अशा बसण्यावर राहतो.
पण तिथे पोहचण्यासाठी त्याने काय केलं? यावर माझं लक्षंच जात नाही.
पण तिथे पोहचण्यासाठी त्याने काय केलं? यावर माझं लक्षंच जात नाही.
आज मी सामान्य माणूस आहे आणि तिथे तसं बसणं म्हणजे माझ्यासाठी काही तरी असामान्य आहे.
शाहरुख आज असामान्य माणूस आहे आणि तिथे तसं बसणं हे त्याला शोभतं आणि तो खरोखर या यशासाठी पात्र देखील आहे.
मुद्दा हा आहे की,
असं असामान्य बनण्यासाठी त्याने तितकी मेहनत घेतली आहे आणि ती तो अजूनही घेत आहे.
जर माझा फोकस त्याच्या मेहनत घेण्यावर असला तर मी सुद्धा ती गोष्ट आणि तीच काय, हवी ती गोष्ट मिळवू शकतो.
गरज आहे ती मेहनत घेण्याची, ती वाढवण्याची आणि न हरता शेवट पर्यंत त्यात सातत्य राखण्याची.
मी इतकं करू शकत असेल तर हॉटेल मध्ये जाऊन मला असं बसणं, ती लक्झरी, तो कम्फर्ट अनुभवणं, तो फील घेणं सहज शक्य आणि परवडण्याजोगं नक्कीच आहे.
****
जाता जाता ,
काही दिवसांपूर्वी शाहरुख ने ट्विटरवर #askSRK असा एक ट्रेंड सुरु केला आहे,
ज्यात तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता आणि तो स्वतः त्याचं उत्तर देतो.
त्यात एकाने असंच विचारलंय, "सर, मन्नत मध्ये एक रूम रेंट वर हवी आहे, किती लागतील ?"
त्याने अतिशय सुंदर उत्तर दिलंय, "३० वर्षांच्या मेहनती इतके. "
****
#मीप्रतिक

Wahhh,
ReplyDeleteThank you :)
DeleteGood focus
ReplyDelete