Posts

Showing posts with the label miPratik

अभ्यास नकोसा वाटतो : भाग ५

Image
LIFE IS A RACE.  अगर तेज़ नहीं भागोगे तो कोई तुम्हे कुचलके आगे निकल जायेगा |  **** धावण्याच्या शर्यतीत सोबत कोण पळतंय हे दिसतं तरी आणि त्या दिसण्यावरून आपण काहीसा अंदाज बांधू  शकतो. म्हणजे बाकी सगळ्या ' कंडिशन ' सारख्या ठेऊन स्थूल आणि सडपातळ व्यक्तीमध्ये शर्यत लावली तर कोण जिंकेल ? सडपातळ व्यक्ती. कारण, विज्ञान सांगतं स्थूल गोष्टींना ' गती देण्यासाठी ' जास्त बल लावावं लागतं . अभ्यासाच्या बाबतीत हे समजणं कठीण आहे. एक तर डोक्याने कोण किती ' स्थूल ' आणि कोण किती ' सडपातळ ' हे दिसत नाही. दुसरं म्हणजे, आज जो स्थूल दिसत आहे तो उद्या ' व्यायामाने ' सडपातळ होऊ शकतो. म्हणजे स्पर्धा वाढली. तिसरं म्हणजे, आपल्याला जितके आपल्या आजूबाजूला दिसतात त्यापेक्षा किती तरी जण या शर्यतीत पळत असतात. मी शाळेत असतांना रेस लावायचो. मार्कांची . इतरांसोबत. शाळेतला अभ्यास करायचो कारण ' करायचा असतो ' आणि ' मार्क्स आणायचे असतात ' म्हणून .एक तर अभ्यासात इतके सारे विषय. प्रत्येक विषयाची वेगळी स्पर्धा. कोणाचं मराठी चांगलं तर कोणाचं गण...

The MASK

Image
With your professional wardrobe, you wear one more thing daily in your office. The Mask ( not face mask ). It's YOU which neither you want to be nor you could be. But wearing it, you pretend to be, what you are not actually. For me, it's a lie which is not only acceptable in corporate but rather is expected one. Sometimes a person after some limit could not lie and that's why wearing this 'mask' is suggested. What exactly am I talking about? That is professional etiquette. People are used to with the 'wrapper' than the product inside. People prefers 'brand' over usability. It is like that only. You know you are lying but under the so called great title of 'professional etiquette'. And I call it 'the mask'. When you just come out of your school, you are trained with dressings and the other certain skills, soft skills. But nowhere you know how corporate life actually works. Rest of the time, you 'buy' your wa...

अभ्यास नकोसा वाटतो : भाग ४

Image
"Diabetes mellitus is a chronic clinical syndrome, characterized by hyper thalassemia due to the lack of insulin. The symptoms are polyhedra, unusual thirst, polyuria, frequent urination and unusual weightloss . " "Please tell us the treatment for pulmonary tuberculosis." "Crebral maleria collectively is a ..." "नहीं " " अरे ऐसी नहीं करनेका। ... ऑर्डर ब्रेक नहीं करनेका।  बहोत मुश्किल से रट्टा मारके आया हू मैं। "There are two stages of treatment. Intensive therapy for two months which includes four drugs. anacin, peniciline," "refantcine " " अरे बीचमे नहीं बोलनेका ना यार।  पूरा जो मेरा रिदम है न तुम.... अभी वापस शुरू करना पड़ेगा। " **** ' लक्षात ठेवण्यासाठी पाठांतर ' म्हणून एक गोष्ट तीनदा लिहायला सांगतात. काही ठिकाणी पाचदा , दहादा तर हे कमी म्हणून काही ठिकाणी पंचवीस वेळा लिहायला सांगतात. खरंच लक्षात राहतं याने ? ' पाठांतर ' खरंच होतं असं करून ? की ' पाठांतर ...

अभ्यास नकोसा वाटतो : भाग ३

Image
" ये है आम जिंदगी " . . . " ये है मेंटॉस जिंदगी " .  .  .  किती जणांच्या बाबत हे वाचून " दिमाग कि बत्ती जल गयी " ? **** शिक्षकांनी $  प्रश्न विचारायचे आणि विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचे .  -- ये है आम जिंदगी .  विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे ( शंका नाही ) आणि शिक्षकांनी $  उत्तर द्यायचे .  --  ये है मेंटॉस जिंदगी  . $ इथे शिक्षक आणि पालक दोन्हीही अपेक्षित आहे. शिकवणं हे शिक्षकांचं काम आहेच आणि तेच घरात पालकांचं . शिकवून झाल्यावर मुलांना कळलं की नाही हे समजण्यासाठी प्रश्न विचारायचे . ते तर तुम्ही परीक्षेत पण करतातच ना. आता मुलांना सांगायचं तुम्ही प्रश्न विचारा . वर वर सोपं वाटेल हे. ते विचारतील आणि तुम्ही उत्तर देताल . नवीन काय यात ? तर त्यांना सांगायचं प्रश्न असा विचारा ज्याचं उत्तर देणं तुम्हाला - शिक्षकांना / पालकांना - अवघड होईल. अगदी सुरवातीला त्यांचे प्रश्न सुद्धा इतके प्रगल्भ नसतील. अपेक्षाही नाही. कारण अवघड प्रश्न विचारण्यासाठी त्यांना आधी अभ्यास करावा ...

अभ्यास नकोसा वाटतो : भाग २

Image
मला क्रिकेट अतिशय बोअर होतं. एक जण बॉल टाकतो. दुसरा त्या बॉलला बॅटने यथेच्छ मारतो. शेवटी ज्या दिशेने तो बॉल गेला असेल त्या जवळपासचा तिसराच कोणी तरी पळत जाऊन तो बॉल पकडून पहिल्या बॉल टाकणाऱ्याकडे फेकतो. हे सगळं किती तरी तास असंच चालू राहतं. एकच गोष्ट रिपीट रिपीट आणि तासंतास. बघणारेपण तेच ते बघत राहतात. मधूनच आरडा ओरडा करतात. हे सगळं कशासाठी? मला आज पर्यंत कळलंच नाही. (कदाचित कळणार देखील नाही.) मी लहान होतो. तेव्हा माझा मामा टीव्हीवर हे क्रिकेट लावून बसायचा. सारखं सारखं तेच ते पाहून मला मग कंटाळा यायला लागला. तेव्हा पासून माझ्यासाठी क्रिकेट हा नावडीचा खेळ झाला. (मुळात याला खेळ म्हणावं यावरच मला आक्षेप आहे. तो मुद्दा बाजूला.) थोडं मोठं झाल्यावर कळलं की हे रिपीट रिपीट करण्यात पण नियम असतात. आधीच कंटाळा. त्यात पुन्हा नियम शिका. कोणी सांगितलंय ? तर म्हणे, काय चाललंय ते कळणार कसं ? नाही कळून घ्यायचं मला. मग मी शिकलोच नाही. आज पर्यंत नाही.  परिणाम, गल्लीतली, शाळेतली मुलं क्रिकेट खेळायची, त्याविषयी बोलायची, मला खेळताही येत नव्हतं आणि बोलायलाह...

अभ्यास नकोसा वाटतो : भाग १

Image
" शाळेत जातोस? " " हो. " " का जातोस? " " घरचे पाठवतात. " " का पाठवतात ? " " अभ्यास करायला. " " अभ्यास का करायचा ? " " ..... " " अभ्यास केल्याने काय होतं? " " .... " " अभ्यास करावा वाटतो? " " बिलकुल नाही. " **** " ह्याला खेळायला सांगा, सगळ्यात पुढे. फक्त अभ्यास म्हणलं की, अंगावर काटा येतो. " " आता स्वयंपाक यायला लागला आहे हिला. पण अभ्यास कधी जमेल, काय माहित? " **** याच संवादात अजून पुढे जात राहिलो तर सापडेल की, मुळात मुलांना अभ्यास सोडून सगळं काही करायचं असतं. अभ्यास तेवढा नको फक्त.  या विषयावर आपणच थोडा अभ्यास केला तर सापडेल की, यातली बरीचशी कारणं सामायिक आहेत. काही थोडी थोडकी कारणं अशी आहेत जी वयपरत्वे बदलतात. पण निष्कर्ष कायम राहतो: " अभ्यास नकोसा वाटतो . " का? कारणं  भरपूर आहेत. सर्व कारणांना कार्यकारणभाव देखील आहे. फक्त आपण दुर्लक्ष करतो कारण या सर्व कारणांपेक्षा आपल्याला ' अभ्यास ...

Meditation Diary

Image
Day 13 | 02/06/2020 [ Sirshree_SelfAwakening (Apna Dhyan SwaDhyan) ] You are not your SELF. That's why the question is being asked Who Are You? When it is in self inquiry, Who I AM? You are not your thoughts, you are not your body. That's why, when thoughts come or have some 'disturbing' bodily experiences, just have your SELF will always remain constant, steady and stable. While meditating, you might have lot of distraction and you may frustrate because, could not concentrate. But, accept it for time being. all thoughts, sounds, etching, numbness etc. things are not constant. They are just about to vanish. Although you can't control them all, doesn't mean they are to disturb you. they are to make you aware that you are distracted from your SELF and go back to it. It reminds you, you are not on STABLE mode. So, can say, these disturbances are blessings in disguise. this session is to aware you about all this. it starts with inquiry and shifts y...

असामान्यांचे सामान्यत्व

Image
सामान्य लोक सामान्यांप्रमाणे राहतात. असामान्य लोक असामान्यांप्रमाणे राहतात. असामान्यांना त्यांच्या असामान्यत्वाचा अनुभव असतोच. ‌त्यामुळे ते वेगळं काही असामान्य करत नाहीत. त्याची त्यांना आवश्यकताही नसते. ते जे सामान्यपणे करतात तेच सामान्यांसाठी असामान्य असते. तर मग असामान्य नक्की कोण? खरा असामान्य म्हणजे असा सामान्य ज्याला असामान्य बनायचं असतं, त्याच सामान्य लोकांमध्ये राहून ! अशा सामान्याला असं असामान्य बनायचं असेल तर असामान्य अशी मेहनत करावीच लागते. पण असं असामान्यत्व तिथपर्यंतच टिकेल जोवर ती व्यक्ती स्वतः सामान्य राहून असामान्य बनण्यासाठी असामान्य अशी मेहनत करेल. नंतर एकदा का तो सामान्यांच्या नजरेतला असामान्य बनला की खरे तर तो असामान्यांमधला सामान्यच असेल ना ! म्हणजेच, असामान्यत्व हे प्रतिष्ठा नाही तर तो एक प्रवास आहे. असा प्रवास जो व्यक्तीला सामान्य असण्यापासून आसामान्य होण्याकडे नेतो. व्याकरणाप्रमाणे असामान्य हे एक व्यक्ती विशेषण झालं. माझ्या मते, हे एक प्रवासवर्णनात्मक विशेषण म्हणल्या जावं. सामान्य व्यक्तीला असामान्य बनल्यावर उगाच 'आपण असामान्य आहोत' ...

किती लागतील ?

Image
मला अश्या ठिकाणी जायला आवडेल जिथे अशी लक्झरी असेल. मी सध्या अशा हॉटेल मध्ये जातो जिथे बसायला खुर्ची असते. मला असं शाहरुख सारखं बसावं वाटलं तरी ते तिथे शक्य होत नाही.  आणि जिथे अशी व्यवस्था असते तिथे मी अजून तरी जाऊ शकत नाही. कारण आजच्या तारखेला (२७/०४/२०२०) मला ते परवडण्याजोगं नाही; एक दिवस नक्की असेल. काय कम्फर्ट आहे ना? हम्म. मला पण हवा आहे असा कम्फर्ट, असा फील. **** जगात जे जे काही भारी असेल, ते ते सर्व मला मिळावं....  असं प्रत्येकाला वाटतं आणि ते साहजिकही आहे. मग नक्की अडचण काय येते?  तर, नेमका आपला फोकसंच चुकतो . ' मला असं शाहरुख सारखं बसायचं आहे एका हॉटेल मध्ये जाऊन. ' माझा फोकस त्याच्या अशा बसण्यावर राहतो. पण तिथे पोहचण्यासाठी त्याने काय केलं? यावर माझं लक्षंच जात नाही. आज मी सामान्य माणूस आहे आणि तिथे तसं बसणं म्हणजे माझ्यासाठी काही तरी असामान्य आहे. शाहरुख आज असामान्य माणूस आहे आणि तिथे तसं बसणं हे त्याला शोभतं आणि तो खरोखर या यशासाठी पात्र देखील...