चोरी ते जॉब ते....



.

मी चोरी करतांना पकडला गेलो.

.

मी जॉबसाठी अप्लाय केलं.
नकार.
मी 'इंटर्नशिप' साठी विचारलं.
नकार.
का?
"मी चोरांना कामावर घेतंच नाही."

.

रस्त्याने जाताना एका ठिकाणी थांबलो.
तिथेही एकाला जॉब साठी विचारलं.
नकार.
वाटलं मी 'हा' जॉब करू शकतो.
मात्र 'आवश्यक गोष्टी' घेण्यासाठी पैसे नव्हते.
मग मी आणखी एक चोरी केली.
आलेल्या पैशातून 'त्या' गोष्टी घेतल्या.
.
.
.
आता मी थोडा अभ्यास सुरु केला.
यातून माझं पहिलं काम यशस्वी झालं.
पण मोबदला कमी मिळाला.
.
.
.
आणखी पैसे कमवायला खूप वेळ लागेल.
त्या वेळेत बऱ्याच 'घटना' निसटतीलही.
म्हणून मी एकाला 'ऑफर' दिली.
.
.
.
आता माझी स्वतःची एक कंपनी आहे.




#मीप्रतिक



#nighcrawler







Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Do We Really....?

“Hey man! You have changed a lot.”