अभ्यास नकोसा वाटतो : भाग १
" शाळेत जातोस? "
" हो. "
" का जातोस? "
" घरचे पाठवतात. "
" का पाठवतात ? "
" अभ्यास करायला. "
" अभ्यास का करायचा ? "
" ..... "
" अभ्यास केल्याने काय होतं? "
" .... "
" अभ्यास करावा वाटतो? "
" बिलकुल नाही. "
****
" ह्याला खेळायला सांगा, सगळ्यात पुढे. फक्त अभ्यास म्हणलं की, अंगावर काटा येतो. "
" आता स्वयंपाक यायला लागला आहे हिला. पण अभ्यास कधी जमेल, काय माहित? "

याच संवादात अजून पुढे जात राहिलो तर सापडेल की, मुळात मुलांना अभ्यास सोडून सगळं काही करायचं असतं. अभ्यास तेवढा नको फक्त.
या विषयावर आपणच थोडा अभ्यास केला तर सापडेल की, यातली बरीचशी कारणं सामायिक आहेत. काही थोडी थोडकी कारणं अशी आहेत जी वयपरत्वे बदलतात. पण निष्कर्ष कायम राहतो: " अभ्यास नकोसा वाटतो . "
का?
कारणं भरपूर आहेत. सर्व कारणांना कार्यकारणभाव देखील आहे. फक्त आपण दुर्लक्ष करतो कारण या सर्व कारणांपेक्षा आपल्याला ' अभ्यास ' जास्त महत्वाचा वाटतो.
****
" अभ्यास का नकोसा वाटतो ? " या प्रश्नाचं सर्वात सामान्य पण तितकंच महत्वाचं कारण, " मला कंटाळा येतो. " किंवा " मला अभ्यास बोरिंग वाटतो. " आणि हे अभ्यासापुरतंच असतं. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये रस असतो. आणखी नीट पाहिलं तर लक्षात येईल, तसं तर चित्रकला हासुद्धा 'अभ्यासाचा'च विषय आहे. तसंच, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे देखील 'अभ्यास'च आहेत. पण या विषयांमध्ये मुलांना खूप रस असतो. ' हा ' अभ्यास कितीही वेळ करायला सांगा, त्यात बिलकुल कंटाळा येत नाही.
मग नक्की कंटाळा येतो कशाचा?
खरंच कंटाळा येतो की असं फक्त वाटत असतं ?
खरंच येत असेल तर कंटाळा येतो म्हणजे नक्की काय होतं ?
स्वतः मुलांकडे हा ' कंटाळा ' दूर करण्याचे काय मार्ग आहेत?
पालक / शिक्षक म्हणून आपण काय मार्ग काढू शकतो?
आणि कंटाळा नसेल येत तर नक्की मग इतर काय कारणं आहेत ज्यामुळे अभ्यास नकोसा वाटतो ?
आणि या सर्वांवर काय करता येईल ? जेणे करून अभ्यास करावासा वाटेल.
( क्रमशः )
#मीप्रतिक

Fantastic
ReplyDeleteSuperb..
ReplyDeletePart 2 is here: https://spratik08.blogspot.com/2020/05/blog-post_24.html
ReplyDelete