अभ्यास नकोसा वाटतो : भाग ५
LIFE IS A RACE.
अगर तेज़ नहीं भागोगे तो कोई तुम्हे कुचलके आगे निकल जायेगा |
****
धावण्याच्या शर्यतीत सोबत कोण पळतंय हे दिसतं तरी आणि त्या दिसण्यावरून आपण काहीसा अंदाज बांधू शकतो. म्हणजे बाकी सगळ्या ' कंडिशन ' सारख्या ठेऊन स्थूल आणि सडपातळ व्यक्तीमध्ये शर्यत लावली तर कोण जिंकेल ? सडपातळ व्यक्ती. कारण, विज्ञान सांगतं स्थूल गोष्टींना ' गती देण्यासाठी ' जास्त बल लावावं लागतं . अभ्यासाच्या बाबतीत हे समजणं कठीण आहे. एक तर डोक्याने कोण किती ' स्थूल ' आणि कोण किती ' सडपातळ ' हे दिसत नाही. दुसरं म्हणजे, आज जो स्थूल दिसत आहे तो उद्या ' व्यायामाने ' सडपातळ होऊ शकतो. म्हणजे स्पर्धा वाढली. तिसरं म्हणजे, आपल्याला जितके आपल्या आजूबाजूला दिसतात त्यापेक्षा किती तरी जण या शर्यतीत पळत असतात.
मी शाळेत असतांना रेस लावायचो. मार्कांची . इतरांसोबत. शाळेतला अभ्यास करायचो कारण ' करायचा असतो ' आणि ' मार्क्स आणायचे असतात ' म्हणून .एक तर अभ्यासात इतके सारे विषय. प्रत्येक विषयाची वेगळी स्पर्धा. कोणाचं मराठी चांगलं तर कोणाचं गणित. इतिहास , भूगोल .... असं करत सगळ्या विषयांची म्हणून एकत्र टक्केवारी. त्यात स्पर्धेला फक्त आपला वर्ग नाही तर बाकी तुकड्या, मग बाकी शाळा, असं करत करत सरते शेवटी बोर्ड . म्हणजे ही नावाला फक्त स्पर्धा . गुणं मात्र बैलं उधळण्याचे. माझ्यासारखे असे किती तरी ' बैलं ' होते जे या अभ्यासाच्या आणि मार्कांच्या ' ओझ्याखाली ' दबून जायचे. अशा वेळी कधी कधी माझं अवसान गळून जायचं . मग मला अभ्यास नकोसा वाटायचा .
****
अभ्यास का करायचा असतो याचं खूप जणांकडून ऐकलेलं एक कारण , चांगले मार्क्स पडले पाहिजेत म्हणून . का ? कारण , पुढे मुलांना स्वतःला हव्या असलेल्या किंवा पालक लादू पाहत असलेल्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा म्हणून. का ? कारण , Life is a race !
हे चांगले मार्क्स म्हणजे नक्की किती ? आपण कितीही आणा , ' शर्माजीका बेटा ' आपल्याहून जास्त आणतो . म्हणजे मुळात प्रॉब्लेम हा होतो की आपल्याकडे टार्गेट नसतं . किती मार्क्स आणले म्हणजे आपण समाधानी असू हे आपलं आपल्यालाच माहित नसतं . कारण 'मिनिमम मार्क्स ' च्या ' क्रायटेरिआ ' मध्ये बसतील इतके जरी मार्क्स आणले तरी आणखी आणले असते तर यापेक्षा भारीतलं कॉलेज मिळालं असतं किंवा यापेक्षा भारीतल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला असता . अपेक्षा चिक्कार . ' प्रेशर कुकर्स ' !

शाळेत असतांना माझी शर्यत फक्त अभ्यासातल्या मार्कांपूरती असायची . तीही फक्त जिंकण्यासाठी. मला वाटायचं, मी तो गोष्टीतला ससा आहे. दमत होतो, थकत होतो. पण थांबलो आणि झोपलो तर कासव जिंकेल हे लहानपणी शिकून ' शहाणा ' झालो होतो म्हणून थांबत नव्हतो. कुठे पोहचल्यावर जिंकणार ? ते मात्र तेव्हा कळत नव्हतं .
****
शर्यतीमध्ये पळायला हरकत नाही. पण किती पळायचं ते माहित पाहिजे . खूप सोपं आहे हे. आपल्यालाही कळलं पाहिजे. नुसतं धावण्याला अर्थ नाही. कुठे थांबायचं ते पण कळलं पाहिजे .
#मीप्रतिक
****

Comments
Post a Comment